भजनी मालिका
← भजनांकडे परत

संगती बावनाचें रावलों सर्व भावें । चंदन होऊनी सवें ठेलों मी वो

sangati bavanachen ravalon sarva bhaven | chandan houni saven thelon mi vo

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
संगती बावनाचें रावलों सर्व भावें । चंदन होऊनी सवें ठेलों मी वो ॥१॥ वेधिला जीव माझा संतचरणीं । आन दुजें मना नाठवेचि स्वप्नी ॥२॥ जागृति स्वप्न सुषुप्तीचा ठाव । अवघा देखे देवाधिदेव ॥३॥ पहातां पाहांता मन नाहीसें जालें । एका जनार्दनीं केलें मज ऐसें ॥४॥