भजनी मालिका
← भजनांकडे परत

सख्या पंढरीच्या राया। घडे दंडवत पायां

sakhya pandharichya raya| ghade dandavat payan

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
सख्या पंढरीच्या राया। घडे दंडवत पायां ॥१॥ ऐसें करीं अखंडित । शुद्ध प्रेम शुद्ध चित्त ॥२॥ वेध माझ्या चिता हाचि लागो पंढरीनाथा ॥३॥ जायें भवानी जन्मोजन्मी म्हणे जनी ॥४॥