भजनी मालिका

भजने

सकळ तुझे पायीं मानिला विश्वास । न करीं उदास आतां मज ॥१॥ जीवीं गातां गोड आइकतां कानीं । पाहातां लोचनीं मूर्ती तुझी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सकळ धर्म मज विठोबाचें नाम । आणीक त्यां वर्म नेणें कांहीं ॥१॥ काय जाणों संतां निरविलें देवें । करिती या भावें कृपा मज ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

सकळ नगरी वाहिली विमानीं । वैकुठ भुवनीं पावविला ॥१॥ करा एकादशी जागर कीर्तन । द्वादशी भोजन द्विजपंक्ती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सकळ पापांपासोनि मुक्त । वाचे उच्चारित राम हरि ॥१॥ ऐसे महिमा वेद सांगें । नक आड मार्गें जाऊं कोण्ही ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सकळ मंत्रां वरिष्ठ सार । विठ्ठल नाम त्रि अक्षर ॥१॥ वाचे उच्चार करितां जप । प्रगटे देहीं विठ्ठल रुप ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

सकळ मंत्रांमाजी मंत्र उत्तम । दोंनीं अक्षरें जगतां राम । निरसोनियां मायादि भ्रम । पाविजे निजधाम अनायसें ॥१॥ तैसाचि मंत्राराज प्रसिध्द । त्रि अक्षरीं जपतां गोविंद । नरनारी बाळकें शुध्द । पावती अच्युतपदातें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

सकळ वैभव निजकर्म भोग । ते तुज उद्वेग दावी काई ॥१॥ मीतूंपण असे तेथें मग कैचें । निर्माण ठायिंचें तोडीं वेल ॥२॥

रचनाकार: संत नामदेव