भजनी मालिका
← भजनांकडे परत

विश्वीं विश्वपती असे पैं लक्ष्मीनाथ

vishvin vishvapati ase pain lakshminath

विश्वीं विश्वपती असे पैं लक्ष्मीनाथ । आपणचि समर्थ सर्वांरूपी ॥ १ ॥ तें रूप गोकुळीं नंदाचिये कुळीं । यशोदे जवळी बाळकृष्ण ॥ २ ॥ सर्वघटी नांदे एकरूपसत्ता । आपणचि तत्त्वतां सर्वांरूपी ॥ ३ ॥ निवृत्तीचें पार कृष्णचि पै सार । गोकुळीं अवतार नंदाघरीं ॥ ४ ॥