भजनी मालिका
← भजनांकडे परत

विषयवासना भाजी त्याचें मूळ । मग सुख कल्लोल प्राप्ति तुज

vishayavasana bhaji tyachen mul | mag sukh kallol prapti tuj

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
विषयवासना भाजी त्याचें मूळ । मग सुख कल्लोल प्राप्ति तुज ॥१॥ आशेचें काबाड कल्पना सगळी । अपटोनि मुळी टाकी परती ॥२॥ भेदाचें भांडें वैराग्याचें हातें । धुवोनि सरतें करी बापा ॥३॥ शांतीचेनि सवें धरीं वेगें सोय । एका जनार्दनीं पाय पावशील ॥४॥