भजनी मालिका
← भजनांकडे परत

विश्वासिया नाहीं लागत सायास । अनायासें रसा अंगा येतो

vishvasiya nahin lagat sayas | anayasen rasa anga yeto

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
विश्वासिया नाहीं लागत सायास । अनायासें रसा अंगा येतो ॥१॥ लेंकराच्या हातें घास मागे माता । वोरसोनि चित्ता सुख पावे ॥ध्रु.॥ गौरव त्या मानी आरुषा वचनीं । भूषण ते वाणी मिरवावी ॥२॥ तुका म्हणे आहेस सकळ ही साक्षी । माझा कईपक्षी पांडुरंग ॥३॥