भजनी मालिका
← भजनांकडे परत

विषयांचे लोलिंगत । ते फजीत होतील

vishayanche lolingat | te phajit hotil

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
विषयांचे लोलिंगत । ते फजीत होतील ॥१॥ न सरे येथें यातिकुळ । शुद्ध मूळबीज व्हावें ॥ध्रु.॥ शिखासूत्र सोंग वरी । दुराचारी दंड पावे ॥२॥ तुका म्हणे अभिमान । नारायणा न सोसे ॥३॥