भजनी मालिका
← भजनांकडे परत

विष पाजावया पूतना ते आली । ते तुवां तारिली काय म्हणुनि

vish pajavaya putana te ali | te tuvan tarili kay mhanuni

रचनाकार: संत नामदेव · अभंग
विष पाजावया पूतना ते आली । ते तुवां तारिली काय म्हणुनि ॥१॥ पुसा या म्हणोनि वेश्या बोभाईलि । ती तुवां तारिली काय म्हणूनि ॥२॥ पिंगळेची आख्या पुराणीं ऐकिली । ते तुवां तारिली काय म्हणुनि ॥३॥ गौतमाचें शापें अहल्या शिळा जाली । ते तुवाम तारिली काय म्हणुनि ॥४॥ नामा म्हणे केशवा अकळ तुझी करणी । विसंबसी झणीं तूंचि मज ॥५॥