भजनी मालिका
← भजनांकडे परत

विश्वाचा व्यापक विश्वंभर साक्षी । नये अनुमानासी वेदशास्त्रां

vishvacha vyapak vishvambhar sakshi | naye anumanasi vedashastran

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
विश्वाचा व्यापक विश्वंभर साक्षी । नये अनुमानासी वेदशास्त्रां ॥१॥ नवल गे माय नवल गे माय । चोरुनियां खाय नवनीत ॥२॥ धरिती बांधती गौळणी बाळा । वोढोअनि सकळां आणिताती ॥३॥ एका जनार्दनीं येतो काकुलती । न कले ज्यांची गति वेदशास्त्रां ॥४॥