भजनी मालिका
← भजनांकडे परत

विश्वंभरा वोळे । बहुत हात कान डोळे

vishvambhara vole | bahut hat kan dole

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
विश्वंभरा वोळे । बहुत हात कान डोळे ॥१॥ जेथें असे तेथें देखे । मागितलें तें आइके ॥ध्रु.॥ जें जें वाटे गोड । तैसें पुरवितो कोड ॥२॥ तुका म्हणे भेटी । कांहीं पडों नेदी तुटी ॥३॥