भजनी मालिका
← भजनांकडे परत

विश्वास याचा न वाटे जया । विन्मुख तया नरदेहो

vishvas yacha na vate jaya | vinmukh taya naradeho

रचनाकार: संत निळोबा · अभंग
विश्वास याचा न वाटे जया । विन्मुख तया नरदेहो ॥१॥ जाईल भोगावया योनी । दु:खदायिनी चौर्‍यांयशी ॥२॥ पुढती जन्म पुढती मरण । पुढती पतन अध:पात ॥३॥ निळा म्हणे पडती फेरा । यातना थोरा भोगावया ॥४॥