भजनी मालिका
← भजनांकडे परत

वटवट केली । न विचारितां मना आली

vatavat keli | na vicharitan mana ali

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वटवट केली । न विचारितां मना आली ॥१॥ मज कराल तें क्षमा । कैसें नेणों पुरुषोत्तमा ॥ध्रु.॥ उचित न कळे । जिव्हा भलतें चि बरळे ॥२॥ तुका म्हणे कांहीं । लौकिकाची चाड नाहीं ॥३॥