भजनी मालिका
← भजनांकडे परत

लौकिकापुरता नोहे हा विभाग । साधलें अव्यंग सुखसार

laukikapurata nohe ha vibhag | sadhalen avyang sukhasar

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
लौकिकापुरता नोहे हा विभाग । साधलें अव्यंग सुखसार ॥१॥ अविट विटेना बैसलें वदनीं । नाम संजीवनीं ध्यानीं मनीं ॥२॥ बहुता काळांचें ठेवणें शिवाचें । सनकसनंदनाचेंक कुळदैवत ॥३॥ एका जनार्दनीं भाग्य तें चांगलें । म्हणोनि मुखा आलें रामनाम ॥४॥