भजनी मालिका
← भजनांकडे परत

लौकिकासाठी या पसाऱ्याचा गोवा । कांहीं नाहीं देवा लागों येत

laukikasathi ya pasaryacha gova | kanhin nahin deva lagon yet

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
लौकिकासाठी या पसाऱ्याचा गोवा । कांहीं नाहीं देवा लागों येत ॥१॥ ठेवावा माथा तो नुचलावा पायीं । ठांयींचिये ठांयीं हालों नये ॥ध्रु.॥ डहुळिल्या मनें वितुळलें रूप । नांवऐसें पाप उपाधीचें ॥२॥ तुका म्हणे देव प्रीतीनें कवळी । ठेवील जवळी उठवूनि ॥३॥