भजनी मालिका

भजने

यातीहीन मज म्हणती देवा । न कळे करूं तुमची सेवा ॥१॥ आम्हां नीचांचे तें काम । वाचें गावें सदां नाम ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

यात्रा फिरोनियां माघारी । आली गोकुळाभीतरी । उव्देग करिती घरोघरीं । म्हणती अनर्थ् वोढवलां ॥१॥ इंद्र कोपलियावरी । अणुमात्रही वृष्टी न करी । बरग पाडूनियां दारीं । उरों नेदील शेंपूट ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

यारे नाचों प्रेमानंदें । विठ्ठल नामाचिया छंद्रें ॥१॥ जाऊं ह्मणती पंढरिची वाट । कळिकाळा भय वाटे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

यालागीं आवडी म्हणा राम कृष्ण । जोडा नारायण सर्वकाळ ॥१॥ सोपें हें साधन लाभ येतो घरा । वाचेसी उच्चारा राम हरी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

यावरी आपण वृक्षातळीं । जाऊनियां वरी न्याहाळि । तंव ते म्हणती अरे वनमाळी । आतुर बुध्दि करुं नको ॥१॥ येथे हा आघाताचा ठावो । नेणसि तूं त्याचा भावो । अणुमात्र निसरतां पावो । होईल निर्वाहो जिवित्वाचा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

यावरी कंस भयाभीत । कृष्णभयें उव्दिग्नचित्त । बैसला असतां निजमंदिरांत । तंव आला अकस्मात रजक बळिया ॥१॥ वस्त्रें आणिलीं घोवट । उंच धोऊनियां चोखट ॥ म्हणे राया राय तूं वरिष्ठ । शोभती विशिष्ट तुज अंगीं ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

यावरी कंस म्हणे दैत्यादिकां । वधूनि येईल जो बाळका । त्यासी अर्ध राज्याची टीका । दूईन छत्र सिंहासन ॥१॥ मग तृणावर्त धेनुकासुर । मग केशिया शकटासुर । अघासुर सर्पविखार । चालिले भार दैत्यांचे ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

यावरी कोणे ऐके दिवशी । कृष्णें घेउनी सौंगडियांशी । आला यमुनेचे प्रदेशीं । तंव गाई खिल्लारें देखिलीं ॥१॥ तयामाजी अंति चोखडें । वत्स गाईचे ते पाडे । त्याचि ऐसें धरुनी रुपडें । वत्सासुर तेथ उभा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

यावरी गडियांसीं खेळत । आला यमुनेतीरा आंत । क्रीडा करितां करितां आर्त । देखिलें ऐसें यमुनेचें ॥१॥ जैशा येऊनियां गौळणी । कृष्णमुखीं घालिती लोणी । मीच अंतरलें गे पापिणी । होऊनियां पाणी वाहातुसे ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

यावरी गौळणी सुंदरी । नूऊनियां निजमंदिरीं । खेळविती परमात्मया श्रीहरी । नाना उपचारी पूजिती ॥१॥ देऊनियां चंदनउटी । केशरी टिळक लाविती लल्लाटीं । नाना सुमनहार कंठी । घालिती वरवंटी श्रीकृष्णा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

यावरी न कळे संचित आपुलें । कैसें वोडवलें होईल पुढें ॥१॥ करील विक्षेप धाडितां मुळासी । किंवा धाडा ऐसी तांतडी हे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

यावरी पुढील कार्यार्थु । साधावया श्रीकृष्णनाथु । चालिले राजभुवना आंतु । तंव दारवंटा समस्त मल्ल उभे ॥१॥ म्हणती कोठें रे करुनियां मेळ । चालिला ते अवघे गोवळ । नेणोनियां राजाज्ञा बळ । जैसे टोळ सैराट ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

यावरी बगासुराची कथा । विचित्र आहे ते ऐकतां । कृष्णकरें पावोनि घाता । महामुक्तीतें वरील ॥१॥ मग तो बगरुपीया असुर । ध्यानस्थ यमुनातीरी स्थीर । झांकूनियां उभय नेत्र । एकाचि पायावरी उभा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

यावरी म्हणे सवंगडियांसी । वत्सें फांकलीरे चौपासी । वळूनि आणा धांबा त्यासी । मग सावकाशी बैसा सुखें ॥१॥ तंव ते म्हणती हो वनमाळी । आजीचि वळती तुमची पाळी । जाऊनियां तूंचि सांभाळीं । आम्ही निष्काम आजिचेनि ॥२॥

रचनाकार: संत निळोबा