भजनी मालिका
← भजनांकडे परत

यातीहीन मज म्हणती देवा । न कळे करूं तुमची सेवा

yatihin maj mhanati deva | na kale karun tumachi seva

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
यातीहीन मज म्हणती देवा । न कळे करूं तुमची सेवा ॥१॥ आम्हां नीचांचे तें काम । वाचें गावें सदां नाम ॥२॥ उच्छिष्टाची आस । संत दासाचा मी दास ॥३॥ चोखा म्हणे नारायण । पदरीं घेतलें मज दीना ॥४॥