भजनी मालिका
← भजनांकडे परत

याल तरी या रे लागें । अवघे माझ्या मागें मागें

yal tari ya re lagen | avaghe majhya magen magen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
याल तरी या रे लागें । अवघे माझ्या मागें मागें ॥१॥ आजि देतों पोटभरी । पुरे म्हणाल तोंवरी ॥ध्रु.॥ हळू हळू चाला । कोणी कोणाशीं न बोला ॥२॥ तुका म्हणे सांडा घाटे । तेणें नका भरूं पोटें ॥३॥