भजनी मालिका

भजने

याचिलागीं परांगना । मानिती हुताशनापरी ज्ञाते ॥१॥ जवळी गेल्या जाळूं शके । म्हणोनि धाकें पळती त्या ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

याचिलागीं वो त्यजियलें भोग । याचिलागीं वो केले नाना याग । याचिलागीं वो अष्टांगादी योग । याचिलागीं या विषयांचे त्याग वो ॥१॥ जन्माजन्मांतरी केली हे सूचना । याचिलागीं वो वसविलें निर्जना । भक्षूनि फळ मूळ प्राशिले जीवना याचिलागीं केलें तीर्थाटना वो ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

याच्या संगसुखें गर्भवास घेतां । येत जात गे कल्पाच्या चळथा । नेघो भुक्ति मुक्ति देतां सायुज्यता । ऐशा गौळणी त्या सुखानंदभरिता वो ॥१॥ धन्य प्रेमळा त्या रंगल्या श्रीरंगी । नेणती दुसरें वों संसारी विरागी । हरिचीं भूषणें त्या लेऊनि निजांगी । सुखी सुखरुप भोगी नित्य त्यागी वो ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

याजसाठी केला होता आटाहास्य । शेवटाचा दिस गोड व्हावा ॥१॥ आतां निश्चितीनें पावलों विसांवा । खुंटलिया धांवा तृष्णेचिया ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

याति शूद्र वैश केला वेवसाव । आधी तो हा देव कुळपूज्य ॥१॥ नये बोलों परि पाळिलें वचन । केलियाचा प्रश्न तुह्मीं संतीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

यातिहीन मज काय तो अभिमान । मानी तुज जन नारायणा ॥१॥ काय सुख मज तयाची हे खंती । आपुलाला घेती गुणभाव ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

याती मतिहीन रूपें लीन दीन । आणीक अवगुण जाणोनियां ॥१॥ केला त्या विठ्ठलें माझा अंगीकार । ऐसा हा विचार जाणोनियां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

यातीकुळ कांहीं नाणी तो मानसीं । धांवें त्यांचे पाठीसी लागवेंगें ॥१॥ आपुलें म्हणविल्या न देखे पारिखें । रक्षी त्या कौर्तुकें आपुले काजा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ