भजनी मालिका
← भजनांकडे परत

यात्रे बोलावितो हरी । कांहो नवजा पंढरी

yatre bolavito hari | kanho navaja pandhari

रचनाकार: संत नामदेव · अभंग
यात्रे बोलावितो हरी । कांहो नवजा पंढरी ॥१॥ विठोबा कृपेचा कोंवळा । बहु भक्तांचा कळवळा ॥२॥ भक्त आठवती चित्तीं । देवा वाटे परम खंती ॥३॥ देव अवज्ञा अनुचित । पृथक सत्ता आत्मघात ॥४॥ ऋण वारी भगवंत । दुबळा नव्हे लक्ष्मीकांत ॥५॥ दास विठा म्हणे त्वरा । यात्ना पंढरीची करा ॥६॥