भजनी मालिका
← भजनांकडे परत

यावरी कंस म्हणे दैत्यादिकां । वधूनि येईल जो बाळका । त्यासी अर्ध राज्याची टीका । दूईन छत्र सिंहासन

yavari kans mhane daityadikan | vadhuni yeil jo balaka | tyasi ardha rajyachi tika | duin chhatra sinhasan

रचनाकार: संत निळोबा · अभंग
यावरी कंस म्हणे दैत्यादिकां । वधूनि येईल जो बाळका । त्यासी अर्ध राज्याची टीका । दूईन छत्र सिंहासन ॥१॥ मग तृणावर्त धेनुकासुर । मग केशिया शकटासुर । अघासुर सर्पविखार । चालिले भार दैत्यांचे ॥२॥ कृष्णें ते ते संहारिलें । नवल अदभुतचि वो केलें । निळा म्हणे आहे वर्णिलें । श्रीवेदव्यासें पुराणीं ॥३॥