भजनी मालिका

भजने

यांसि समाचार सांगतों सकळा । चलावें गोकुळा म्हणे देव ॥१॥ देव राखे तया आडलिया काळें । देव सुखफळें देतो दासां ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

यासी कोणी म्हणे निंदेचीं उत्तरें । नागवला खरें तोचि एक ॥१॥ आड वाटे जातां लावी नीट सोई । धर्मनीत ते ही ऐसी आहे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

यासी पाहतां वो हदयस्थ पाहीला । यासि बोलतां वो वेदुचि घोकिला । यासि खेळतां कुसंगदोष गेला । यासि भोगितां हा प्रत्यवायी गळाला वो ॥१॥ ऐसा निजानंद परमात्मा श्रीहरी । आम्हीं लाधलों वो भाग्याच्या संसारी । नित्य आलिंगूं या हदयाच्या अंतरीं । ऐशा निजबोधें निवाल्या सुंदरी वो ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

याहांकी बात नहीं मेरी आवछे । तोरे चरण कमल मैं द्यावछे ॥१॥ सुंदरतुन नंदनंदन लालछे । गळां शोभे वैजंयती मालछे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

याहो क्षेत्र केलें जुंपिलीं आउतें । अठारा धान्यें तेथें पेरियेलीं ॥१॥ मेघ:शाम मेघ वर्षें सर्वा धारीं । बीज विटेवरी सिन्नलें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

युक्तायुक्त ज्ञान वैराग्यसाधन । महातपोधन वरद योग्य ॥१॥ आनंदाचा ओघ भक्तीचा सोहळा । हरि वेळोवेळां जपत वाचे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

युक्ताहार न लगे आणिक साधनें । अल्प नारायणें दाखविलें ॥१॥ कलियुगामाजी करावें कीर्तन । तेणें नारायण देईल भेटी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

युक्तिप्रयुक्तीचें प्रमाण मी नेणें । केशवचरणें ध्यातों मनीं ॥१॥ आणिक साधन काय म्यां करावें । ब्रह्मादिक देव मौन ठेले ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

युक्ती तंव झाल्या कुंठीत सकळा । उरली हे कळा जीवनाची ॥१॥ संतचरणीं भावें ठेविलें मस्तक । जोडोनि हस्तक राहिलोंसें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

युगा ऐसें पळ तुजविण जाय । पाहातोसी काय अंत माझा ॥१॥ कोमळ ह्लदय तुझें पंढरीच्या राया । कठिण सखया कैसें झालें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

युगांबरोबरी जाताती घटिका । गोकुळींच्या लोकां तैसें झालें ॥१॥ उदास दिसती वनें दाही दिशा । कायरे जगदीशा आह्मां केलें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

युगायुगीं पीडिली विरहिणी । नाठवीं ध्यानीं मनीं चक्रपाणी । म्हणोनी वियोगाची जाचणी । तो भेंटला संतसंग साजणी ॥१॥ विरह गेला सुख झालें अपार । जन्मोजन्मी चीं तुटे वेरझार वो ॥धृ॥

रचनाकार: संत एकनाथ

युगें गेलीं जरी अपारें । भूमिसी न मिळती खापरें ॥१॥ ऐसीं पापियांचीं मनें । स्थिर न होतीं कीर्तनें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

ये दशे चरित्र केलें नारायणें । रांगतां गोधनें राखिताहे ॥१॥ हें सोंग सारिलें या रूपें अनंतें । पुढें हि बहु तें करणें आहे ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

ये रे कृष्णा खुणाविती खेळों भातुकें । मिळालिया बाळा एके ठायीं कवतुकें । कळों नेदी माया त्यासचि ते ठाउकें । खेळतोंसें दावी लक्षलक्षापें मुकें ॥१॥

रचनाकार: संत तुकाराम

ये हरी मज कृपा देई दान । नासी तिमिर दाखवी चरण । आर्त पुरवावे भेटी देऊन । नको उपेक्षुं आलिया शरण ॥१॥ काम क्रोध अहंकार नको देही । आशा तृष्णा माया लज्जा चिंता काही । वास पंढरीचा जन्म सदा देई । आणिक दुजे मागणे तुज नाही ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम