भजनी मालिका
← भजनांकडे परत

यावें माहेरास । हे च सर्वकाळ आस

yaven maheras | he cha sarvakal as

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
यावें माहेरास । हे च सर्वकाळ आस ॥१॥ घ्यावी उच्छिष्टाची धणी । तीर्थ इच्छी पायवणी ॥ध्रु.॥ भोग उभा आड । आहे तोंवरी च नाड ॥२॥ तुका म्हणे देवें । माझें सिद्धी पाववावें ॥३॥