भजनी मालिका
← भजनांकडे परत

यात्रेहूनि आले गांवा । घेऊनियां विठ्ठल देवा

yatrehuni ale ganva | gheuniyan viththal deva

रचनाकार: संत निळोबा · अभंग
यात्रेहूनि आले गांवा । घेऊनियां विठ्ठल देवा ॥१॥ भक्त पूजिती आदरें । टाळ विणे मृदंगस्वरें ॥२॥ दिंडया पताका छबिने । नृत्य हरिकथा गायनें ॥३॥ निळा म्हणे निज भुवनीं । पूजिती स्तविती अनुदिनीं ॥४॥