आतां माझा सर्वभावें हा निर्धार । न करीं विचार आणिकांसी
atan majha sarvabhaven ha nirdhar | na karin vichar anikansi
आतां माझा सर्वभावें हा निर्धार । न करीं विचार आणिकांसी ॥१॥ सर्वभावें नाम गाईन आवडी । सर्व माझी जोडी पाय तुझे ॥ध्रु.॥
atan majha sarvabhaven ha nirdhar | na karin vichar anikansi
आतां माझा सर्वभावें हा निर्धार । न करीं विचार आणिकांसी ॥१॥ सर्वभावें नाम गाईन आवडी । सर्व माझी जोडी पाय तुझे ॥ध्रु.॥
atan majhiya bhaktibhava | palata deva nedava
आतां माझिया भक्तिभावा । पालटा देवा नेदावा ॥१॥ मग मी नाचेन कीर्तनमेळीं । नामावळी आळवित ॥२॥
atan majhi chinta tuj narayana | rukminiramana vasudeva
आतां माझी चिंता तुज नारायणा । रुक्मिणीरमणा वासुदेवा ॥१॥ द्रौपदी संकटीं वस्त्रें पुरविलीं । धांव त्वां घेतली गजेंद्रासी ॥२॥
atan majhe naka vanun gun dosh | kariton upadesh yacha kanhin
आतां माझे नका वाणूं गुण दोष । करितों उपदेश याचा कांहीं ॥१॥ मानदंभासाठीं छळीतसें कोणा । आण या चरणां विठोबाची ॥२॥
atan majhe sakhe yeti varakari | jiva as thori lagalise
आतां माझे सखे येती वारकरी । जीवा आस थोरी लागलीसे ॥१॥ सांगतील माझ्या निरोपाची मात । सकळ वृत्तांत माहेरींचा ॥ध्रु॥ काय लाभ झाला काय होते केणे । काय काय कोणे सांठविले॥२॥
atan majhya duhkha kon ho sangati | rakhumaicha pati pave chi na
आतां माझ्या दुःखा कोण हो सांगाती । रखुमाईचा पति पावे चि ना ॥१॥ कायविधा त्यानें घातलीसे रेखा । सुटका या दुःखा न होय चि ॥२॥
atan majhya bhava | antaray nako deva
आतां माझ्या भावा । अंतराय नको देवा ॥१॥ आले भागा ते करितों । तुझे नाम उच्चारितों ॥ध्रु.॥
atan majhya mana | ichi ghado upasana
आतां माझ्या मना । इची घडो उपासना ॥१॥ ऐसें करींपांडुरंगा । प्रेमवोसंडेसेंअंगा ॥ध्रु.॥
atan majhya mayabapa | tun ya papa prayishchatta
आतां माझ्या मायबापा । तूं या पापा प्रायिश्चत्त॥१॥ फजित हे केले खळ । तो विटाळ निवारीं ॥ध्रु.॥
atan majhya sahavasen raha | hoil paha kautuk ten
आतां माझ्या सहवासें रहा । होईल पहा कौतुक तें ॥१॥ चला जाऊं मांडू खेळ । म्हणती गोपाळ बहुत बरें ॥२॥
atan mi ananya yethen adhikari | hoin kone pari nenen deva
आतां मी अनन्य येथें अधिकारी । होइन कोणे परी नेणें देवा ॥१॥ पुराणींचा अर्थ ऐकतां मानस । होय कासावीस जीव माझा ॥ध्रु.॥
atan mi deva pangharon kai | bhikechen ten hi ure chi na
आतां मी देवा पांघरों काई । भिकेचें तें ही उरे चि ना ॥१॥ सदैव दुबळें नेणें चोर । देखोनि सुनाट फोडितो घर ॥ध्रु.॥
atan mi na paden sayasin | sansaraduhkhachiye pashin | sharan righen santansi | thav payampashin magen tyan
आतां मी न पडें सायासीं । संसारदुःखाचिये पाशीं । शरण रिघेन संतांसी । ठाव पायांपाशीं मागेन त्यां ॥१॥ न कळे संचित होतें काय । कोण्या पुण्यें तुझे लाधती पाय । आतां मज न विसंबें माय । मोकलूनि धाय विनवीतसें ॥२॥
atan mi patit aisa sach bhaven | kalon anubhaven alen deva
आतां मी पतित ऐसा साच भावें । कळों अनुभवें आलें देवा ॥१॥ काय करावें तें रोकडें चि करीं । राहिली हे उरी नाहीं दोघां ॥ध्रु.॥
atan mi pusen ten sanga re umanen | tumhi aleti kothuni janen kothen
आतां मी पुसेन तें सांगा रे उमाणें । तुम्ही आलेती कोठुनी जाणें कोठें ॥१॥ मग विचारती गोवळ म्हणती नेणों मूळ । ऐसेचि आम्ही आढळ दास तुझे ॥२॥
atan mi sarvatha navhen ga durbal | yatihinakul dainyavana
आतां मी सर्वथा नव्हें गा दुर्बळ । यातिहीनकुळ दैन्यवाणा ॥१॥ माय रखुमाई पांडुरंग पिता । शुद्ध उभयतां पक्ष दोन्ही ॥ध्रु.॥
atan yajan kaishapari | sansara nohe uri
आतां यजन कैशापरी । संसारा नोहे उरी ॥१॥ सदगुरुवचन मंत्र अरणी । तेथोनि प्रगटला निर्धुम अग्नी ॥२॥
atan yacha artha (sang) pure pure deva | yeun dya kanavala tumhanlagi
आतां याचा अर्थ (संग) पुरे पुरे देवा । येऊं द्या कनवाळा तुम्हांलागी ॥१॥ गुंतलोंसे काढा यांतोनी बाहेरी । माझें तो हरि कांही न चाले ॥२॥
atan yacha gheuni tras | alon tumhans sharan hari
आतां याचा घेऊनी त्रास । आलों तुम्हांस शरण हरि ॥१॥ घ्याल तरी सोडवून या काळापासून पुण्य तुमचें ॥२॥
atan yavari sandehapurin | naka shrihari lotun maj
आतां यावरि संदेहपुरीं । नका श्रीहरी लोटूं मज ॥१॥ लाऊनियां आपुलिये कासे । न्या भलतैसे परपारा ॥२॥