भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां माझी चिंता तुज नारायणा । रुक्मिणीरमणा वासुदेवा

atan majhi chinta tuj narayana | rukminiramana vasudeva

रचनाकार: संत नामदेव · अभंग
आतां माझी चिंता तुज नारायणा । रुक्मिणीरमणा वासुदेवा ॥१॥ द्रौपदी संकटीं वस्त्रें पुरविलीं । धांव त्वां घेतली गजेंद्रासी ॥२॥ उपमन्या आळी तुवां पुरविली । अढळपदीं दिल्ही वस्ति धरुवा ॥३॥ नामा म्हणे करा करुणा केशवा । तूं माझा विसावा पांडूरंगा ॥४॥