भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां याचा अर्थ (संग) पुरे पुरे देवा । येऊं द्या कनवाळा तुम्हांलागी

atan yacha artha (sang) pure pure deva | yeun dya kanavala tumhanlagi

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
आतां याचा अर्थ (संग) पुरे पुरे देवा । येऊं द्या कनवाळा तुम्हांलागी ॥१॥ गुंतलोंसे काढा यांतोनी बाहेरी । माझें तो हरि कांही न चाले ॥२॥ वारंवार करुणा करितों देवराया । कां न ये कनवाळा तुम्हां लागीं ॥३॥ चोखा म्हणे आतां न करा उदास । पुरवावी आस मायबापा ॥४॥