भजनी मालिका

भजने

मरोनि जाईन गुणनामावरूनि । तुझ्या चक्रपाणी मायबापा ॥१॥ चुकविलीं दुःखें मायेचा वोळसा । तोडोनियां आशापाश तेणें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मर्दुनी शंखासुरा हातें वागविसी कलीवरा । तेवीं निवटोनि अहंकारा । माझ्या वागविशी शरीरा ॥१॥ येथें नवल नव्हे पहा हो । माझा देहचि वागवे देवो ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मल्हार महुडें गगनीं दाटलें । विजु खळें गर्जिन्नलें गे माय ॥१॥ गोविंद पाहाया लौकरी । कैसे वरुषताहे मधु धारी ये माया ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

मस्तकीं केश चिकटलें होती । जैं ते निघती आपुले हातीं ॥१॥ मिळती जैशा माय बहिणी । हातीं घेउनी तेलफणी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मस्तकीं ठेवुनियां डेरा । करूं निघाली विकरा । साच करितसे पुकारा । म्हणे गोविंद घ्या वो ॥१॥ बोल बोलती आबळा । तंव त्या हांसती सकळा । मुखीं पडियेला चाळा । या गोपाळाचा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

महर्षी देव स्तविती ज्यातें । कृतांजुळी हातें जोडूनियां ॥१॥ तो हा उभा विटेवरी । रम्य तीरीं चंद्रभागे ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

महा तम अंक दाता जो मोक्षाचा । गुरुपदी साचा भाव असो ॥१॥ आनंदित मन चिंतनाचे ठायीं । मनी नसो काहीं विकल्प तो ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

महा पापराशी तरले कीर्तनीं । प्रत्यक्ष पुराणीं वंद्य जाले ॥१॥ वाल्हा अजामेळ तारिली गणिका । त्रैलोक्यीं देखा सरते जाले ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ