भजनी मालिका
← भजनांकडे परत

मस्तक माझें संतापायीं । ठेउनी होऊं उतराई

mastak majhen santapayin | theuni houn utarai

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मस्तक माझें संतापायीं । ठेउनी होऊं उतराई ॥१॥ वारंवार क्षणक्षणा । नामघोष करिती जाणा ॥२॥ देउनी अभयदान । करिती पतीतपावन ॥३॥ एका जनार्दनीं पाही । संतापायीं ठेवी डोई ॥४॥