भजनी मालिका
← भजनांकडे परत

मशीं पोरा घे रे बार । तुझें बुजीन खालील द्वार

mashin pora ghe re bar | tujhen bujin khalil dvar

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मशीं पोरा घे रे बार । तुझें बुजीन खालील द्वार ॥१॥ पोरा हमामा रे हमामा रे ॥ध्रु.॥ मशीं हमामा तूं घालीं । पोरा वरी सांभाळीं खालीं ॥२॥ तरीच मशीं बोल । पोरा जिव्हाळ्याची ओल ॥३॥ मशीं घेतां भास । जीवा मीतूंपणा नास ॥४॥ मज सवें खरा । पण जाऊं नेदी घरा ॥५॥ आमुचिये रंगीं । दुजें तगेना ये संगीं ॥६॥ तुक्यासवें भास । हरी जीवा करी नास ॥७॥