भजनी मालिका
← भजनांकडे परत

मल्हार महुडें गगनीं दाटलें । विजु खळें गर्जिन्नलें गे माय

malhar mahuden gaganin datalen | viju khalen garjinnalen ge may

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मल्हार महुडें गगनीं दाटलें । विजु खळें गर्जिन्नलें गे माय ॥१॥ गोविंद पाहाया लौकरी । कैसे वरुषताहे मधु धारी ये माया ॥२॥ आनंदें मयूरें नाचती आपैसे । प्रेमे निळकंठ झाले ते कैसे ॥३॥ नामया स्वामी द्दष्टी सोज्वळ । जीव लागला गोपाळेगे माय ॥४॥