भजनी मालिका

भजने

माकडें मुठीं धरिलें फुटाणे । गुंतले ते नेणे हात तेथें ॥१॥ काय तो तयाचा लेखावा अन्याय । हित नेणे काय आपुलें तें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मागणें तें आम्हीं मागूं देवा । देई हेवा कीर्तनीं ॥१॥ दुजा हेत नाहीं मनीं । कीर्तनावांचुनी तुमचीया ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मागणें तें आह्मा नाहीं हो कोणासी । आठवावें संतासी हेंचि खरें ॥ १ ॥ पूर्ण भक्त आह्मां ते भक्ती दाविती । घडावी संगती तयाशींच ॥ २ ॥

रचनाकार: संत सावता

मागणें तें एक आम्हांप्रती द्यावें । निरंतर यावें जागरणा ॥१॥ या हरिदासांचा संग बरवा । आनंदें राघवा गाऊं गीतीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मागणें तें एक तुजप्रति आहे । देशी तरि पाहें पांडुरंगा ॥१॥ या संतांसी निरवीं हें मज देई । आणिक दुजें काहीं न मगें तुज ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

मागणें तें मागों देवा । करूं भक्ती त्याची सेवा ॥१॥ काय उणे तयापाशीं । रिद्धीसिद्धी ज्याच्या दासी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मागण्याची न करुं गोष्टीं । तुम्हां पोटीं भय वाटे ॥१॥ नामचि तुमचें पुरे देवा । न करुं हेवा आणिक ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

मागतां कवतुक । दीन होऊनी रंक । दारोदारीं भीक । मागें धांवे ॥१॥ मग ते करी काय । पाठी देउनी पाय । रसातळीं पाहे । घालूं धावें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मागतां देखोनि दिठी । हातपाय घालूनि पोटीं । पर्वत पडिल्या पाठीं । देणॆं नाहीं ॥१॥ मागतां न देसी । दांतीं भोये धरिसी । पांढरा डुकर होसी । तेणें कर्में ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मागतां पैं कैवाडें । लुंची लागे मुंडे । नागवा होऊनी पुढें । उभा ठाके ॥१॥ मागतां फ़ाडोवाडे । घाऊनियां घोडा चढे । स्वर्ग घेऊनि वाढे । करी मारामारी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मागता भिकारी जालों तुझे द्वारीं । देई मज हरी कृपादान ॥१॥ प्रेम प्रीति नाम उचित करावें । भावें संचरावें हृदयामाजी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मागतियाचे दोनचि कर । अमित भांडार दातियाचें ॥१॥ काय करूं आतां कासयांत भरूं । हा मज विचारु पडियेला ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मागत्याची कोठें घडते निरास । लेंकरा उदास नाहीं होतें ॥१॥ कासया मी होऊं उतावीळ जीवीं । जाणता गोसावी सर्व आहे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मागायास गेलों सिदोरी । तुझ्या मायाघरीं गांजियेलों ॥१॥ तुजविणें ते नेदी कोणा । सांगतां खुणा जिवें गेलों ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम