भजनी मालिका
← भजनांकडे परत

महा दोष होत अगणित

maha dosh hot aganit

रचनाकार: संत बोधले · अभंग
महा दोष होत अगणित । नामे पावत वैकुंठ ॥१॥ चला हात धरुनी जाऊ । माझ्या विठोबाला पाहु ॥ २ ॥ भिमा भरली दोनी थड्या । चला टाकु आत उड्या ॥३॥ बांधु नामाची सांगडी । तेणे उतर पैल थडी ॥४॥ विठोबाची झाली भेटी । दोष निघाले कपाटी ॥५॥ बोधला म्हणे करा निर्धार । हा तो उतरिल पैल पार ॥६॥