भजनी मालिका
← भजनांकडे परत

मरोनि जाईन गुणनामावरूनि । तुझ्या चक्रपाणी मायबापा

maroni jain gunanamavaruni | tujhya chakrapani mayabapa

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मरोनि जाईन गुणनामावरूनि । तुझ्या चक्रपाणी मायबापा ॥१॥ चुकविलीं दुःखें मायेचा वोळसा । तोडोनियां आशापाश तेणें ॥ध्रु.॥ केली काया तनु हिंवसी शीतळ । चिंतातळमळ नाहीं ऐसी ॥२॥ काळें तोंड काळ करूनि राहिलें । भूतमात्र जालें सज्जनसखें ॥३॥ तुकयाबंधु म्हणें अवघ्या दशदिशा । मुक्त रे परेशा तुझ्या पुण्यें ॥४॥