भजनी मालिका
← भजनांकडे परत

महा पापराशी तरले कीर्तनीं । प्रत्यक्ष पुराणीं वंद्य जाले

maha paparashi tarale kirtanin | pratyaksha puranin vandya jale

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
महा पापराशी तरले कीर्तनीं । प्रत्यक्ष पुराणीं वंद्य जाले ॥१॥ वाल्हा अजामेळ तारिली गणिका । त्रैलोक्यीं देखा सरते जाले ॥२॥ कीर्तनीं दोष पळती रानोरान । यापरतें आन दुजें नाहीं ॥३॥ एका जनार्दनीं कीर्तन सार । तेणें पैलपार उतरलों ॥४॥