भजनी मालिका

भजने

भाग्यांचें भाग्य धन्य तें संसारीं । सांठविती हरि हृदयामाजीं ॥१॥ धन्य त्यांचें कुळ धन्य त्याचें कर्म । धन्य त्याचा स्वधर्म नाम मुखा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

भांडवल माझें लटिक्याचे गांठी । उदीम तो तुटी यावी हेचि ॥१॥ कैसी तुझी वाट पाहों कोण्या तोंडें । भोंवतीं किं रे भांडे गर्भवास ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

भांडवी माउली कवतुके बाळा । आपणा सकळां साक्षित्वेसीं ॥१॥ माझी माझी म्हणे एकएकां मारी । हे ती नाहीं दुरी उभयंता ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

भांडारी येऊनि करिती प्रार्थना । द्विजांसी दक्षणा काय द्यावी ॥१॥ जया लागे जितुकें तितुकें त्यानें घ्यावें । तुह्मीं न रहावें उभें तेथें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

भानुदासाचे कुळी महाविष्णुचा अवतार । आदी क्षेत्री स्थान वस्ती गोदातीर ॥१॥ ओवाळु आरती स्वामी एकनाथा । तुमचे नाम घेता हरे भवभ्य चिंता ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

भांबावला देव संतामागें धावें । उघडाचि प्रभवे पंढरीये ॥१॥ युगें अठ्ठावीस पुंडलिकासाठीं । उभा जगजेठी विटेवर ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

भांबावले जन म्हणती माझें माझें । वाउगेंचि वोझें वाहताती ॥१॥ खराचिये परी उकरडा सेविती । नोहे तयां गती अधम जाणा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ