भजनी मालिका
← भजनांकडे परत

भांडवी माउली कवतुके बाळा । आपणा सकळां साक्षित्वेसीं

bhandavi mauli kavatuke bala | apana sakalan sakshitvesin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भांडवी माउली कवतुके बाळा । आपणा सकळां साक्षित्वेसीं ॥१॥ माझी माझी म्हणे एकएकां मारी । हे ती नाहीं दुरी उभयंता ॥ध्रु.॥ तुझे थोडे भातें माझें बहु फार । छंद करकर वाद मिथ्या ॥२॥ तुका म्हणे एके ठायी आहे वर्म । हेंचि होय श्रम निवारिते ॥३॥