भजनी मालिका
← भजनांकडे परत

भांडणचि जालें । मग जीवाचें काय आलें

bhandanachi jalen | mag jivachen kay alen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भांडणचि जालें । मग जीवाचें काय आलें ॥१॥ येऊं नेदावी पुढती । आड भयाची ते जाती ॥ध्रु.॥ करितां सरोबरी। कांहीं न ठेवावी उरी ॥२॥ तुका म्हणे शूर । व्हावे धुरेसींच धुरे ॥३॥