भजनी मालिका

भजने

भावना अभावना निमाली अंतरीं । वायां हावभरी नाहीं मन ॥१॥ कामक्रोध ज्याचे दमोनियां गेलें । इंद्रियें समरसलीं एकें ठायीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

भावनेच्या मुळें अंतरला देव । शिरला संदेह भय पोटीं ॥१॥ पोटीं होतें मागें जीव द्यावा ऐसें । बोलिल्या सरिसें न करवे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

भावबळें कैसा झालासी लाहान । मागें संतीं ध्यान वर्णियेलें ॥१॥ तें मज उचित करूनियां देवा । दाखवीं केशवा मायबापा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

भावभक्तिचिया प्रीतीं जेवविला । देऊनि ढेकर वो पूर्णपणें घाला । नेणों आनंदाचा प्रवाह लोटला । ऐसिया स्वानंदाचीं वचनें अनुवादला वो ॥१॥ म्हणे केले ते पावले उपचार । तुम्ही आवडीनें प्रेमाचे प्रकार । झाली तृप्ति आतां घ्यावो देतों वर । पुन्हां नातळो हा तुम्हांसि संसार वो ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

भावाचिये बळे होऊनि लहान । आपुलें थोरपण विसरला ॥१॥ न म्हणे यातिकुळ तें सुशीळ । उत्तम चांडाळ हो कां कोण्ही ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

भाविक हें संत कृपेचें सागर । उतरती पार भवनदी ॥१॥ तयांचियां नामें तरताती दोषी । नासती त्या राशी पातकांच्यां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

भाविका त्या गोपी येतो काकुळती । तुमचेनि विश्रांती मजलागीं ॥१॥ मज निराकारा आकारासी येणें । तुमचें तें ऋण फेडावया ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

भाविकां हें वर्म सांपडलें निकें । सेविती कवतुकें धणीवरी ॥१॥ इच्छितील तैसा नाचे त्यांचे छंदें । वंदिती तीं पदें सकुमारें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम