भजनी मालिका
← भजनांकडे परत

भाग्याची उजरी । दिसे यावरी वोडवली

bhagyachi ujari | dise yavari vodavali

रचनाकार: संत निळोबा · अभंग
भाग्याची उजरी । दिसे यावरी वोडवली ॥१॥ म्हणोनियां कृपावंत । झाले संत मायबाप ॥२॥ पाचारुनी देत मोहें । प्रेमपेहे पाजिती ॥३॥ निळा म्हणे सांगती कानीं । माझें मजलागुनी स्वहित ॥४॥