भजनी मालिका
← भजनांकडे परत

भाग्याचा उदयो किं दैवाचि गति

bhagyacha udayo kin daivachi gati

भाग्याचा उदयो किं दैवाचि गति । मज जोडली संगती संताची ॥१॥ माझें मीच भांडवल घेउनिया निगुती । लाभाची गति श्री विठ्ठलु ॥२॥ देशदेशाउरा न लगेची जाणें । ठाईच जोडणें एक्या भावें ॥३॥ खेपखेपांतर अनेक सोशिलें । मुदल उरलें लेखा चारी ॥४॥ मुदल देउनि वाणेरा फ़ेडिला । उत्तीर्ण जाला दोही पक्षी ॥५॥ चौघे साक्ष देवउनि अंतरीं । वेव्हारा ज्ञानेश्वरी खंडियला ॥६॥