भजनी मालिका
← भजनांकडे परत

भाग्याचेनि भाग्य उदो पैं दैवयोगें

bhagyacheni bhagya udo pain daivayogen

भाग्याचेनि भाग्य उदो पैं दैवयोगें । तें पुंडलिका संगें भीमातटीं ॥ १ ॥ ध्यान मनन एक करितां सम्यक । होय एकाएक एक तत्त्व ॥ २ ॥ उदोअस्तुमेळें ब्रह्म न मैळें । भोगिती सोहळे प्रेम भक्त ॥ ३ ॥ निवृत्ति निवांत विठ्ठल सतत । नघे दुजी मात हरिविण ॥ ४ ॥