भजनी मालिका

भजने

भले भणवितां संतांचे सेवक । आइत्याची भीक सुखरूप ॥१॥ ठसावितां बहु लागती सायास । चुकल्या घडे नास अल्प वर्म ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

भले रे भाई जिन्हें किया चीज । अछा नहिं मिलत बीज ॥१॥ फीरतफीरत पाया सारा । मीटत लोले धन किनारा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

भले लोक नाहीं सांडीत ओळखी । हे तों झाली देखी दुसऱ्याची ॥१॥ असो आतां यासी काय चाले बळ । आपुलें कपाळ वोडवलें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

भल्याचें कारण सांगावें स्वहित । जैसी कळे नीत आपणासी ॥१॥ परी आम्ही असों एकाचिये हातीं । नाचवितोचित्तीं त्याचें तैसें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

भवजलधि अगाध तरावया दुस्तर । रचिलें पंढरपूर चंद्रभागा ॥१॥ तारूं पंढरिनाथ मोलेंविण उतरितु । उगला असे तिष्ठतु वाट पाहे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

भवभयनाशक रामनाम तारक । शंकर राजा सुख जाणतसे ॥१॥ योगयाग नको आणिक साधनें । नामपरतें पेणें आणिक नाहीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

भवरोगियांसी औषध हें नाम । सेवावे परम आवडीनें ॥१॥ सर्वकाळ करा नामाचें चिंतन । सदा समाधान होय तेणें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

भवव्याघ्र देखोनि भ्याले माझे डोळे । जालेसें व्याकुळ चित्त माझें ॥१॥ पाव गा पाव गा पाव गा विठोबा । पाव गा विठोबा मायबापा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

भवसागर तरतां । कां रे करीतसां चिंता । पैल उभा दाता । कटीं कर ठेवुनियां ॥१॥ त्याचे पायीं घाला मिठी । मोल नेघे जगजेठी । भावा एका साठीं । खांदां वाहे आपुल्या ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

भवसागर तोडितं कं रे करितसां चिंता । पैल उभ दाता पांडुरंग ॥१॥ निजाचें जें पीठ सोडूनि वैकुंठ । येथें वाळवंट आवडलें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव