भजनी मालिका

भजने

भारवाही नोळखती या अनंता । जवळी असतां अंगसंगें ॥१॥ अंगसंगें तया न कळे हा देव । कळोनि संदेह मागुताला ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

भाळे भोळे नरनारी । येती प्रती संसत्वरीं पंढरीये ॥१॥ करती स्नान वंदिती चरणां । क्षेत्र प्रदक्षिणा करिताती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

भाव दावी शुद्ध देखोनियां चित्त । आपल्या अंकित निजदासां ॥१॥ सांगे गोपाळांसि काय पुण्य होतें । वांचलों जळते आगी हातीं ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

भाव धरी कां रें साचा । उच्चार करीं नामाचा । पंथ विठोबाचा । दृढ धरीं ॥१॥ विठ्ठल विठ्ठल वाचे । वदे कां रे तूं साचें । दोष जातील जन्माचें । संदेह नाहीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

भाव धरी तया तारील पाषाण । दुर्जना सज्जन काय करी ॥१॥ करितां नव्हे नीट श्वानाचें हें पुंस । खापरा परीस काय करी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

भाव धरुनियां वाची ज्ञानेश्वरी । कृपा करी हरी तयावरी ॥१॥ स्वमुखें आपण सांगे तो श्रीविष्णु । श्रीगीता हा प्रश्न अर्जुनेसी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

भाव धरुनी शरण येती । तयां मोक्ष सायुज्यप्रांप्ती । ऐसी वेद आणि श्रुती । गर्जतसे सादर ॥१॥ म्हणोनी न करा आळस । सुखे जा रे पंढरीस । प्रेम कीर्तनाचा रस । सुखें आदरें सेविजे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

भाव भक्ती भाग्यवंत । तयां संत भेटती ॥१॥ येर ते भाग्यें जाती वायां न भजतां पायां संतांच्या वचनीं यांचे विश्वास धरिती । धन्य ते होती उभय लोकीं ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

भाव भक्तीचा भुकेला । दास दासांचा अंकिला । न वजे दुरी उभा ठेला । अवघा झाला त्यांचाचि ॥१॥ भक्तवचनें ऐके कानीं । भक्त आवडी पाहे नयनीं । भक्त ह्रदयीं आलिंगुनी । निज ऐश्वर्य अर्पी त्यां ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

भाव भावित भाव भावित भावित निजभाव भावना । निजबोध जालिया कैंची भाव भाविक भावना ॥१॥ भक्ति भावित शक्ति बोधीत शोधीत निजसत्त्व । भक्तिमुक्ति विरहित बोधिते निजसत्व ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

भाव लागला भगवंतीं । हरिरुप पवित्र जगतीं । पाहता कर्माकर्म गति । ब्रह्मास्थिति अखंड ॥१॥ भक्ति म्हणे सोहंशक्ति । सांडिं भवभय आसक्ती । पाहतां निजभाव विरक्ति । सर्वाभूतीं भगवंत ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ