भजनी मालिका
← भजनांकडे परत

भानुदासाचे कुळी महाविष्णुचा अवतार । आदी क्षेत्री स्थान वस्ती गोदातीर

bhanudasache kuli mahavishnucha avatar | adi kshetri sthan vasti godatir

रचनाकार: संत निळोबा · अभंग
भानुदासाचे कुळी महाविष्णुचा अवतार । आदी क्षेत्री स्थान वस्ती गोदातीर ॥१॥ ओवाळु आरती स्वामी एकनाथा । तुमचे नाम घेता हरे भवभ्य चिंता ॥२॥ जनार्दनाची कृपा दत्तात्रयाचा प्रसाद । भागवती टीका नारायण आत्मबोध ॥३॥ ब्रहमाविष्णु महेश ज्यासी छळावया येती । न ढळे ज्याची निष्ठा होसी एकात्मता भक्ति ॥४॥ कावडीने पाणी ज्याघरी चक्रपाणि वाहे । अनन्य भक्तिभावे निळा वंदी त्याचे पाय ॥५॥