भजनी मालिका

भजने

धन्य धन्य साधु दर्तति भूतळीं । जे कां भाळींभोळीं तारावया ॥१॥ जयाच्या दर्शनें पातकाई धुणी । होय तो सज्जनीं मान्य सदा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

धन्य पंढरीचे सकळही जन । जिहीं सख्य केलें जाण विठठलपायीं ॥१॥ विठठल ह ध्यानीं विठठल हा मनीं । विठठल चिंतनीं रात्रंदिवस ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

धन्य पुंडलिक भक्त निवडला । अक्षयीं राहिला चंद्रभागीं ॥ १ ॥ भक्त नामदेव अक्षयीं जडला । पायरी तो झाला महाद्वारीं ॥ २ ॥

रचनाकार: संत नरहरी

धन्य पुण्यभूमि आळंदी हें गांव । दैवताचें नांव सिद्धेश्वर ॥१॥ चौर्‍यांशीं सिद्धींचा सिद्धभेटी मेळा । तो सुखसोहळा काय सांगूं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

धन्य पृथ्वी दक्षिन भाग । जेथें उभा पांडुरंग ।मधे शोभे पुंडलीकक लिंग । सन्मुख चांग भीमरथी ॥१॥ काय वानुं तो महिमा । दृष्टी पाहतांचि भीमा । पैलथडी परमात्मा । शिवास जो अगम्य ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

धन्य प्रतिष्ठान क्षेत्र महिवरी । गोदेचियें तिरीं पुण्यभूमि ॥१॥ धन्य तो श्रीगुरु जनार्दन सखा । त्रैलोक्य देखा पावन केलें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

धन्य भाग्य गोकुळींचे राज्य । जेथें क्रीडा केली यादवराजें ॥१॥ काय तें वानुं सुख आनंदु । सुख संतोष गोकुळीं परमानंदु ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

धन्य भाग्याचे जन इहलोकीं । कीर्तनें जाले सुखी कृतकृत्य ॥१॥ पातकी घातकी यासी सोपा पंथ । कीर्तन तरती कलीमाजी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

धन्य महाराज अलंकापुरवासी। साष्टांग तयासी नमन माझें ॥ १॥ या ज्ञानदेवाचे नित्य नाम घेती वाचें । उद्धरती तयाचें सकळ कुळे ॥२॥

रचनाकार: संत सेना

धन्य महाराज पुंडलीक मुनी। वैकुंठीचा सखा आणिला भूतळालागोनी ॥१॥ केला उपकार जग तारिलें सकळ । निरसली भ्रांति माउली स्नेहाळ ॥२॥

रचनाकार: संत सेना

धन्य माय व्याली सुकृताचें फळ । फळ तें निर्फळ हरीविण ॥१॥ वेदाचेंहि बीज हरि हरि अक्षरें । पवित्र सोपारें हेंचि एक ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

धन्य ही यमुना धन्य हें गोकुळ । वृक्षादि सकळ धन्य धन्य ॥१॥ धन्य ह्या गोपिका धन्य हे गोपाळ । पक्षादि सकळ धन्य धन्य ॥२॥

रचनाकार: संत नामदेव