भजनी मालिका
← भजनांकडे परत

धन्य धन्य साधु दर्तति भूतळीं । जे कां भाळींभोळीं तारावया

dhanya dhanya sadhu dartati bhutalin | je kan bhalimbholin taravaya

रचनाकार: संत नामदेव · अभंग
धन्य धन्य साधु दर्तति भूतळीं । जे कां भाळींभोळीं तारावया ॥१॥ जयाच्या दर्शनें पातकाई धुणी । होय तो सज्जनीं मान्य सदा ॥२॥ विश्वीं विश्वंभर दाखविती पूर्ण । भवाचें बंधन तोडोनियां ॥३॥ जाती विजाती व्हावया प्रज्ञानहो । एक मग मोहो सोडविती ॥४॥ नामा म्हणे सदां साधुसी वाणितां । वाचे पवित्रता अखंडित ॥५॥