भजनी मालिका
← भजनांकडे परत

धन्य पृथ्वी दक्षिन भाग । जेथें उभा पांडुरंग ।मधे शोभे पुंडलीकक लिंग । सन्मुख चांग भीमरथी

dhanya pruthvi dakshin bhag | jethen ubha pandurang |madhe shobhe pundalikak ling | sanmukh chang bhimarathi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
धन्य पृथ्वी दक्षिन भाग । जेथें उभा पांडुरंग ।मधे शोभे पुंडलीकक लिंग । सन्मुख चांग भीमरथी ॥१॥ काय वानुं तो महिमा । दृष्टी पाहतांचि भीमा । पैलथडी परमात्मा । शिवास जो अगम्य ॥२॥ दोन्ही कर धरुनि जघनीं । वाट पाहे चक्रपाणी । एका शरण जनार्दनीं । भक्तांसाठीं घाबरा ॥३॥