भजनी मालिका
← भजनांकडे परत

धन्य भाग्याचे जन इहलोकीं । कीर्तनें जाले सुखी कृतकृत्य

dhanya bhagyache jan ihalokin | kirtanen jale sukhi krutakrutya

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
धन्य भाग्याचे जन इहलोकीं । कीर्तनें जाले सुखी कृतकृत्य ॥१॥ पातकी घातकी यासी सोपा पंथ । कीर्तन तरती कलीमाजी ॥२॥ योगयोग व्रत तप कल्पकोडी । कीर्तन श्रवण गोडी तेथें नाहीं ॥३॥ वेदशास्त्र पुराण श्रुतीचें आनुमोदन । करा रे कीर्तन कलीमाजीं ॥४॥ एका जनार्दनीं आल्हादें कीर्तन । करितां श्रोते वक्तें जाण पावन होती ॥५॥