भजनी मालिका
← भजनांकडे परत

धन्य महाराज अलंकापुरवासी। साष्टांग तयासी नमन माझें

dhanya maharaj alankapuravasi| sashtang tayasi naman majhen

रचनाकार: संत सेना · अभंग
धन्य महाराज अलंकापुरवासी। साष्टांग तयासी नमन माझें ॥ १॥ या ज्ञानदेवाचे नित्य नाम घेती वाचें । उद्धरती तयाचें सकळ कुळे ॥२॥ इंद्रायणी स्नान करिती प्रदक्षिणा । तुटती यातना सकळ त्याच्या ॥३॥ सेना म्हणे त्याचें धन्य झालें जिणें। ज्ञानदेव दरुशनें मुक्त होती॥४॥