भजनी मालिका

भजने

धन्य गोकुळ महीतळीं मंडळ । सुखावलें ब्रह्म जेथें झालें सगुण ॥१॥ काय न कळे आवडी त्याचा भाव । सुख नेलें रे गोवळीं ह्मणती देव ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

धन्य गोदातीर धन्य प्रतिष्ठान । धन्य तेथील जन रहिवासी ॥१॥ कृष्णकमलातीर्थी चरण नाथांचे । उध्दरी जगाचे कलिदोष ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

धन्य चंद्रभागा धन्य वाळूवंट । तेथें सभादाट वैष्णवांची ॥१॥ ठायीं ठायीं कीर्तन होत नामघोष । जळाताती दोष जन्मातरींचे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

धन्य ज्याचे चरणीं गंगाओध झाला मस्तकीं धरिला उमाकांतें ॥१॥ धुंडितां ते पाय शिणला तो ब्रह्मा। बोल ठेवीं कर्मा आपुलीया ॥ २॥

रचनाकार: संत जनाबाई

धन्य ते पंढरी धन्य पंढरिनाथ । तेणें हो पतित उद्धरिले ॥१॥ धन्यनामदेवधन्यपंढरिनाथ । तयानेअनाथउद्धरिले॥२॥

रचनाकार: संत जनाबाई

धन्य ते पंढरी धन्य पंढरिनाथ । तेणें हो पतीत उद्धरिले ॥१॥ धन्य नामदेव धन्य पंढरिनाथ । तयानें अनाथ उद्धरिले ॥२॥

रचनाकार: संत जनाबाई

धन्य ते पंढरी धन्य पंढरिनाथ । तेणें हो पतीत उद्धरिले ॥१॥ धन्य नामदेव धन्य पंढरिनाथ । तयानें अनाथ उद्धरिले ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

धन्य ते संसारीं पवित्र ते वाणी । अखंड उच्चारणी रामनाम ॥१॥ तयांचीच एक सरली येरझार । उतरले पार भव-नदी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

धन्य तेचि संत भक्त भागवत । हृदयीं अनंत नित्य ज्यांच्या ॥१॥ धन्य त्यांची भक्ति धन्य त्यांचे ज्ञान । चित्त समाधान सर्वकाळ ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

धन्य त्या गोपिका धन्य त्यांच्या गया । धन्य मही माया ब्रह्मा ह्मणे ॥१॥ विश्वात्मा जो हरी क्रीडे या वनांत । तृणादि समस्त धन्य धन्य ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

धन्य त्याचा शुध्‍द भावो । आरधिला देवो पंढरीचा ॥१॥ धन्य त्यांचें जन्मकर्म । गाईलें नाम विठोबाचें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

धन्य त्यांची तयां माय प्रसवली । ज्यांची निष्ठा जडली विठ्ठल रुपीं ॥१॥ विठ्ठल आसनीं विठ्ठल भोजनीं । विठ्ठल शयनीं न विसंबती ॥२॥

रचनाकार: संत निळोबा